ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
सिंहस्थ कुंभमेळा अन् रोचक दंतकथा
पृथ्वीवरचा श्रद्धेचा सगळ्यात मोठा दृश्य सोहळा म्हणजे कुंभमेळा. बारा वर्षांतून एकदाच नाशिक आणि त्र्यंबक क्षेत्री भरणारा सिंहस्थ कुंभमेळा धार्मिक सोहळा राहिलेला नाही, तर तो आंतरराष्ट्रीय इव्हेन्ट झाला आहे.
सिंहस्थ अन् प्राचीन इतिहास
`समुद्रमंथन’ ही कथा नाशिकच्या कुंभमेळ्याशी अधिक जवळीक साधते ती गोदावरीच्या जन्मकथेमुळे. म्हणूनच नाशिकच्या कुंभमेळ्याचे महत्त्व इतरांपेक्षा वेगळे असल्याचे म्हटले जाते.
सिंहस्थ अन् फसलेली पंचांग परंपरा
सिंहस्थ हा महाकुंभ असल्याने यात नेहमी काही ना काही वाद अथवा अपघात घडत असतात. कधी ते आखाड्यांमध्ये असतात तर कधी शैव व वैष्णवांमध्ये.
सिंहस्थ-गोदावरी माहात्म्य अन् साधू
गोदावरी सर्व नद्यांमध्ये ही प्राचीन व श्रेष्ठ असून, तिच्या केवळ स्मरणाने सर्व पापांचा नाश होतो, असे म्हटले जाते. प्रभू रामचंद्रांनी पंचवटीच्या वास्तव्यात तिच्या तीरावर पितृश्राद्ध घातले.
सिंहस्थ-दिगंबर आखाडा (अनी)
वैष्णवपंथीयांचा सर्वांत मोठा आखाडा म्हणून दिगंबर आखाड्याचे वर्णन करता येईल. दिगंबर असे जरी या आखाड्याचे नाव असले, तरी हे साधूवेश परिधान करतात. या आखाड्याला श्री पंच रामनंदीय दिगंबर आखाडा असे म्हटले जाते.
सिंहस्थ-नाशिकच्या आखाड्यांची रचना
आखाडा म्हणजे साधूंची निवासाची आणि भोजनाची सोय. या आखाड्यांमध्ये महंत व साधूंचे म्हणून काही अधिकार असतात. याबाबत माहिती करून घेतल्याशिवाय आखाड्यांबाबत जाणून घेण्यात काहीच अर्थ नाही.
सिंहस्थ-निर्वाणी आखाडा
ज्यातून सर्व अहंमभाव निघून जातात असा आखाडा असेही याला म्हटले जाते. हा आखाडा आठव्या शतकात निर्माण झाल्याचे म्हटले जाते.
सिंहस्थ-शाहीस्नानाची अनोखी परंपरा
सिंहस्थ कुंभमेळ्यात शाहीस्नानाला महत्त्व आहे. जगभरातून या शाहीस्नानाच्या तिथींना भाविक शहरात येतात. या तिथी फक्त साधूमहंतांसाठी अथवा आखाड्यांसाठी नसतात.
सिंहस्थातील विधींचे माहात्म्य
एका तपानंतर येणाऱ्या सिंहस्थात पुण्य मिळविण्यासाठी शाहीस्नानात सहभागी होण्याबरोबरच विविध विधी करण्याची परंपराही आहे. जगभरातून येणारे भाविक आपल्या पुरोहिताकडे सिंहस्थाचे विधी करतात.
English to Hindi Transliterate